माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश तांबे यांच्याकडून प्रभू श्रीरामांचे फोटो असलेल्या आठ हजार झेंड्यांची वाटप

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सर्व भारताचे आराध्य दैवत श्रीराम प्रभू यांचे अयोध्या मध्ये भव्य आणि दिव्य मंदिराच्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे व त्या ठिकाणी श्रीराम प्रभूचे आगमन होणार आहे, या निमित्ताने गावोगावी दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने पारोळा शहरातील भवानी गडाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश तांबे यांच्याकडून श्री रामाच्या फोटो असलेल्या आठ हजार झाडांची वाटप करण्यात आलेले आहे.

अजून २१ तारखेपर्यंत पाच ते सहा हजार झेंड्याचे वाटप करणार आहेत व पथक्यांची वाटप करणार आहे, तरी त्यांची संकल्पना आहे की पारोळा शहरातील प्रत्येक गल्ली मध्ये व चौकांमध्ये पताके व झेंडे लावले जात आहे तसेच प्रत्येक घरावर झेंडा असावा हर घर झेंडा अशी संकल्पना केली आहे व तरी तालुक्यातून राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्रीडा व्यायामशाळा विविध स्तरावरून माजी नगराध्यक्ष डॉ मंगेश तांबे यांच्या वर कौतुकाच्या वर्षाव होत आहे.

Protected Content