मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयीन नोकरदार पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

यावल/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयीन नोकरांची पतसंस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नूतन मराठा महाविद्यालयातील बॉस सभागृहात उत्स्फूर्तपणे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

नोकरदार पतसंस्थेचे चेअरमन डॉ. हेमंत येवले हे सभेच्या अध्यक्षतेस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे मविप्र संस्था संचालक प्रा. महेंद्र भोईटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख व यावल महाविद्यालयाचे व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, उपप्राचार्य प्रा.संजय पाटील इ. मान्यवर या सभेस प्रामुख्याने उपस्थित होते.

पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन प्रा. संदिप शकोकार,संचालक प्रा.राजेंद्र देशमुख, संचालक प्रा. अनिल वाघ, संचालक प्रा.संजय पुरी, संचालक प्रा. भगतसिंग पाटील, यावलच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, वरणगावचे प्र. प्राचार्य प्रा.विजय पवार, व्यवस्थापक दिनकरराव देशमुख उपस्थित होते. सभेला मोठया प्रमाणात सभासद उपस्थित होते. सभेची सुरवात श्रद्धांजली अर्पण करून झाली. सभासद पाल्यांचा गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सदरच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली, यावेळी सभासदांना एक हजार रूपये प्रमाणे भत्ता देण्यात आला. अविनाश पाटील, अरविंद भोईटे यांनी परिश्रम घेतली. सदरची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Protected Content