पारोळा तालुक्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान

parola news 2

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यात दोन दिवसा पासून पावसाची रिमझिम सुरू असून 22 ऑक्टोंबर रोजी मात्र दुपारी ३ वाजेनंतर पावसाने वेग धरल्याने पिकांचे नुकसान झाले.

तालुक्यातील करमाळ तामसवाडी, बोळे, देवगाव, आडगाव, शेवगे, ढोली, टोळी, तरडी परिसरात सायंकाळी 6 ते 7 जोरदार पाऊस झाला तर बोरी धरणाला उगम क्षेत्रात धुळे जिल्ह्यातील शिरूड, आर्वी, बोरकुंड भागातही जोरदार पाऊस झाल्याने सदर पाण्याचा विसर्ग हा बोरी धरणात होत आहे. त्यामुळे रात्री ९ वाजेला धरणाचे ११ दरवाजे उघडावे लागले संकेत लघु पाट बंधारे विभागाकडून मिळत असून असाच पाऊस सुरू राहिल्यास तालुक्यातील मुख्य पीक कापूस व मक्याचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता असून ज्वारी, बाजरीची पिके देखील पिवळे पडत असून शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास वाया जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Protected Content