अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात योग शिबीर उत्साहात

pratap mahavidyalay

अमळनेर प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयातील सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे येथील प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थींनी वसतीगृहात आठ दिवसीय ‘योगा अवेरनेस शिबीर’ घेण्यात आले.

मु.जे. महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातील एम.ए. (व्दितीय वर्ष) अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी गजानन मुरलीधर माळी, अर्चना रविंद्र सनेर यांनी येथील प्रताप महाविद्यालयातील ‘मुलींच्या वसतीगृहात’तील मुलींसाठी आठ दिवशीय ‘योगा अवेअरनेस शिबीर’ घेतले. हे शिबीर 2 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 6 ते 7 या वेळेत प्रताप कॉलेजच्या ‘इनडोअर स्टेडिअम’ मध्ये घेतले गेले. याकामी प्राचार्या प्रा.डॉ.आरती गोरे, प्रा.डॉ.देवानंद सोनार, प्रा. गितांजली भंगाळे, प्रा. धीरज वैष्णव, प्रा. सचिन पाटील यांचे सहकार्य लाभले.

Protected Content