तलाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आर. डी. पाटील

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा तलाठी संघटनेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पाचोरा तलाठी आर. डी. पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यात प्रामुख्याने सरचिटणीसपदी निशिकांत माने, कार्याध्यक्षपदी व्ही. मानकुंभरे, सचिन मोरे, उपाध्यक्षपदी अनंत खवले, प्रशांत पवार, सहचिटनिसपदी पी. एस‌. सोनवणे, खजिनदारपदी रुपेश ठाकूर, संघटकपदी गणेश मराठे हिशोब तपासणीसपदी मंगेश परिसे, सल्लागारपदी ईश्वर कोळी, विभागीय उपाध्यक्षपदी राहुल पवार (पाचोरा उपविभाग), प्रशांत पाटील (एरंडोल उपविभाग), विनोद पाटील (जळगाव उपविभाग), महिला प्रतिनिधीपदी पूनम पाटील, माधुरी वेरुळकर कायम निमंत्रित सदस्यपदी एन. आर‌. ठाकूर, डी. एस. भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक बिनविरोध होणेकामी एम. एस. भालेराव, मोतीराया, पंजे, जे. डी. भंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले व जिल्हाभर समन्वयाची भूमिका पार पाडली.

जिल्हाअध्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आर. डी. पाटील यांचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार मोहन सोनार, भागवत पाटील व सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी अभिनंदन केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!