पारोळा पोलिसांनी फिर्यादीला कोर्टाचे आदेशावरून परत केले एक लाख रुपये

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जेएमएफसी कोर्ट पारोळा यांच्या आदेशानुसार फिर्यादीला पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व मुद्देमाल लिपिक डब्ल्यूपीएन आम्रपाली पालवे यांना रोख एक लाख रुपये परत करण्यात आले आहेत.

शहरातील शेवडी गल्ली येथे राहणारे फिर्यादी नामे भैय्या सुदाम चौधरी यांच्या एकूण 25 बकऱ्या चोरीस गेलेल्या होत्या व दिलेले फिर्याद वरून बकरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली पो ना प्रवीण पाटील यांनी पो. ना. संदीप सातपुते, पो. कॉ. अभिजित पाटील, पो. कॉ. किशोर भोई, पो. कॉ. राहुल पाटील, पो. कॉ. राहुल कोळी, पो. कॉ. हेमचंद्र साबे यांनी सखोल तपास करून एकूण 10 बकऱ्या आरोपी कडून जप्त केल्या व इतर 15 बकऱ्या चोरटयांनी विकून टाकलेने नमूद बकऱ्याचे रोख एक लाख रोख रुपये तपासात हस्तगत केले आहे.

नमूद गुन्ह्यात आरोपी नामे 1) महेंद्र( गणेश )सुदाम पाटील 2)वाल्मिक भगवान पाटील 3)संजय सोमा पाटील, 4)अंकुश नेहरू पाटील 5) रोशन थकरून मराठे सर्व रा पळासखेडे ता. पारोळा 6) शिवाजी रामराव पाटील जामोद 7) चोरीच्या बकऱ्या घेणारे मोहम्मद शरीफ शहा सिराज शहा रा सिल्लोड जिल्हा औरंगाबाद तसेच 2 विधी संघर्ष बालक असे एकूण 9 आरोपींना निष्पन्न करून मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकी 10 बकऱ्या जप्त करुन 15 बकऱ्याचे रोख एक लाख रुपये जप्त केले. के. के. माने JMFC कोर्ट पारोळा यांचे आदेशावरून रोख एक लाख रुपये फिर्यादिस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व मुद्देमाल कारकून WPN आम्रपाली पालवे यांनी परत दिले आहे. एक लाख रुपये परत घेतांना फिर्यादीने आनंदित होऊन पोलिसांचे आभार मानले आहे.

 

Protected Content