परिक्षा न झाल्यास विद्यार्थ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सन 2021-22 च्या अंतिम परीक्षा होणे संदर्भात विद्यार्थ्यांनी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सन 2021 आणि 22 यामधील होणारी अंतिम वर्षाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे परीक्षा झालेली नव्हती. ती परीक्षा अद्यापपर्यंत झालेले नाही. या परीक्षेत एकूण 88 विद्यार्थी बसलेले आहेत. वारंवार या संदर्भात अनेक वेळा विनंती करूनही परीक्षेचा प्रश्न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहे. तरी आपल्या पातळीवरून योग्य ती कारवाई करून एक महिन्याच्या आत परीक्षा होतील असे नियोजन करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा. व त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. एका महिन्याच्या आत परीक्षा न झाल्यास सर्व विद्यार्थी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारोळा येथे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना दिले आहे.

 

 

Protected Content