अमळनेरात “चित्रकला आर्ट वर्क प्रदर्शन” उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील इंदिरा भवन येथे गुजराती महिला मंडळांच्या वतीने चित्रकला वर्क प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुनंदाबेन गुजराती यांनी मार्गदर्शन केले.

त्या म्हणाल्या की, आयुष्यात मनाची एकाग्रता टिकवायची असेल तर छंद हा असला पाहिजे. यासाठी महिलांनी कलात्मक छंद जोपासावा. याने त्यांच्यात विविध कला, कौशल्य यांचा विकास होतो. असे प्रतिपादन अमळनेर येथील इंदिरा भवन येथे गुजराती महिला मंडळ आयोजित चित्रकला, आर्ट वर्क प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाच्या उदघाटक डॉ . सुनंदाबेन गुजराती ह्या बोलत होत्या.

अमळनेर येथील अविनाश सोनार यांच्या पत्नी नीता सोनार यांनी तयार केलेल्या चित्र व आर्ट वर्क प्रदर्शन भरविण्यात आले होते.सौ. नीता सोनार ह्या “मास्टर ऑफ फाईन आर्ट ” गोल्ड मॅडेलीस्ट आहेत त्यांनी तयार केलेल्या विविध चित्र, आर्ट वर्क पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पहाडे व महिला मंडळाच्या सदस्या यांनी परिश्रम घेतले.

Protected Content