अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलिस कोठडी

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील टोळी येथील सामूहिक अत्याचार व खून प्रकरणातील मुख्य आरोपीला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टोळी (ता.पारोळा) येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शिवनंदन शालिक पवार याला १९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. यानंतर त्यास २० नोव्हेंबरला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यावर २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

टोळी येथील तरुणी पारोळा येथील मामांकडे आली असतांना तिचे अपहरण करून तिघांनी सामूहिक अत्याचार करून तिला विषय पाजले. यानंतर उपचारादरम्यान तिचा धुळे येथे मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात खून, बलात्कार आदी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण ३ आरोपींचा समावेश आहे. शिवाय कासोदा येथील एका संशयित महिलेची देखील चौकशी सुरू आहे. या घटनेतील मुख्य आरोपी शिवनंदन पवार याने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी १९ नोव्हेंबरला त्यास अटक केली. यानंतर २० नोव्हेंबरला त्यास अमळनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला २३पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content