Home क्राईम फोटो व्हायरल करत धमकावले : दोघांच्या विरोधात गुन्हा

फोटो व्हायरल करत धमकावले : दोघांच्या विरोधात गुन्हा

0
102
FIR

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टिटवी येथील अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टिटवी येथील गणेश दादा चव्हाण (वय २०) हा तरुण तालुक्यातील टिटवी येथील एका अल्पवयीन मुलीच्या मागे लागला होता. नेहमी युवतीमागे फिरून लग्नाची मागणी घालत होता. तरुणीने नकार दिल्याने तो धमकी देत होता. २७ फेब्रुवारीला तरुणी आपल्या मैत्रीणीच्या घरी जात असताना, गणेशने पाठलाग करत तरुणीच्या मैत्रिणीच्या घरात तिला बळजबरीने पकडले. तसेच तिच्यासोबत फोटो काढले. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी फोटो व्हायरल करेल. ही बाब कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ३ रोजी संशयिताने फोटो व्हायरल केले.

या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसांत गणेश चव्हाण व किरण पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि नीलेश गायकवाड करत आहेत.


Protected Content

Play sound