नारखेडे इंग्लीश स्कूलच्या फी वाढीविरोधात पालकांचा उद्रेक

भुसावळ प्रतिनिधी । येथील एन.के. नारखेडे इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांची फी अचानक दोन हजार रूपयांनी वाढविल्यामुळे पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, भुसावळ शहरातील एन. के. नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांची फी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाढविल्याने पालकवर्गामध्ये मॅनेजमेंट विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या बाबत जाब विचारण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात मुख्याध्यापिकेला धारेवर धरले. येेळी वाढीव फी भरा अन्यथा तुमच्या मुलाचे अ‍ॅडमिशन काढून घ्या असे मुख्याध्यापिकेने म्हटल्यावर शाळेत चांगलाच गोंधळ निर्माण झाला. कोणतीही पूर्वसूचना न देता पुढच्या वर्षाची फी दोन हजार रुपयांनी वाढविली असल्याचे एन. के .नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.

संबंधीत शाळेचे संस्थाचालक मनमानी कारभार करीत असून दरवर्षी विद्यार्थ्यांची फी वाढविण्यात येत असते. अचानक फी वाढविल्याने आम्ही कशी भरणार असा प्रश्‍न संतप्त पालकांनी संस्थाचालक व मुख्याध्यापकांसमोर उपस्थित केला. विद्यार्थ्यांकडून गॅदरिंगची फी, स्पोर्ट्स फि घेतली जाते.मात्र विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्याचेही पालकांनी म्हटले आहे. तर मुख्याध्यापकांनी लावण्यात आलेल्या आरोपाचे खंडण केले आहे. संस्था चालक काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मुख्याध्यापिक कोमल कुळकर्णी म्हणाल्या की, आम्ही गेल्या दोन वर्षापासून फी वाढ केली नाही.शिक्षकांचे पगार वाढ तसेच विदयार्थ्याचे विकासाच्या दृष्टीने त्यांना काही सुविधा पुरवायच्या असल्याने फी वाढ केली आहे.

Add Comment

Protected Content