दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | २०२४ पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचा क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते मंगळवारी गौरव करण्यात आला. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ५० लाख आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ३० लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आले. मिश्र सांघिक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या तिरंदाज शीतल देवीला 22.5 लाख रुपये अतिरिक्त देण्यात आले.
यावर्षीच्या पॅरीस पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताने आतापर्यंतच्या इतिहासाची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने एकूण २९ पदके जिंकली असून त्यात ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य पदक प्राप्त केली. यासह भारत १८व्या स्थानावर राहिला. २०२८ लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यासाठी पॅरा-ॲथलीट्सना पूर्ण पाठिंबा आणि सुविधा देण्याचे आश्वासनही मांडविया यांनी दिले.
क्रीडामंत्री मांडविया म्हणाले, देश पॅरालिम्पिक आणि पॅरा गेम्समध्ये पुढे जात आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकमध्ये आम्हाला अधिक पदके आणि पदके जिंकता यावीत यासाठी आम्ही आमच्या सर्व पॅरा-ॲथलीट्सना सर्व सुविधा देऊ.