अमळनेर प्रतिनिधी । काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे धुळे येथे सभेला आले असता युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी त्यांची भेट घेतली.
काँग्रेसचे माजी युवा जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याशी भेट घेऊन आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा केली. काँग्रेसच्या सचिव अँड ललिता पाटील यांनीही खासदार राहुल गांधी यांच्याशी व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची चर्चा-विनिमय केली. याप्रसंगी राहुल गांधी यांनी तरुणांनी काँग्रेस पक्षामध्ये यावे व काँग्रेस पक्ष समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावा असे आवाहन केले. पराग पाटील यांनी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात आणून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगून पराग पाटील यांच्या कामाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्यांच्याबरोबर अनेक अमळनेर तालुक्यातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.