मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | वसुली संदर्भात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माजी गृहमंत्री देशमुख प्रकरणात माफीचा साक्षीदार असतील. यावरून माविआतील मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झोप उडाली असणार, अशी टीका भाजपचे किरीट सोमय्या यांनी केली असून राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजारीच्या आरोपावर देखील बेईमान कोण? असा प्रश्न विचारला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार वाझे हे या खटल्यात आरोपी म्हणून नव्हे, तर सीबीआयचे साक्षीदार असतील. आणि उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे सचिन वाझेची नियुक्ती करीत वाझेकडून आलेला १०० कोटीच्या वसुलीचा पैसा परबांच्या रिसॉर्टमध्ये आला. आता मंत्री अनिल देशमुख तर अडकले. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तुमचे काय होणार, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे.
तसेच राज्यसभेच्या उमेदवारीवरून मोठा घोडेबाजार होणार असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या पक्षाचे आणि मित्रपक्षाचे आमदार विकले जाऊ शकतात, अशी भीती का वाटते? यात बेईमान कोण आहे. शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते? असा प्रश्न देखील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर विचारला आहे.