पंत चांगला खेळाडू असून त्याला वेळ द्या – गांगुली

sourav ganguly

 

कोलकाता वृत्तसंस्था । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सध्या फॉर्मसाठी झुंजणार्‍या यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला पाठिंबा दर्शवला आहे. रिषभ पंत हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याला थोडा वेळ द्या. तो चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तो हळूहळू परिपक्व होईल. त्यामुळे त्याला वेळ दिलाच पाहिजे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात अप्रतिम खेळ केला, असे गांगुली म्हणाले.

बांगालदेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 26 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. पंतने खराब यष्टीरक्षण आणि चुकीच्या डीआरएसच्या निर्णयामुळे संघाला फटका बसला. पहिला सामना भारताला गमवावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला असला तरी या सामन्यातही पंतने चूक केली. त्याने यष्टीचित केलं पण स्टम्पच्या पुढे ग्लोव्हज असल्यानं तो नो बॉल देण्यात आला. त्यानंतर पंतने धावबाद करून थोडा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गांगुलीने सांगितले की, बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डनवर 22 ते 26 नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या डे/नाइट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या घंटा वाजवून सामना सुरु झाल्याची घोषणा करतील. त्यांच्याशिवाय भारताचे बुद्धिबळपटू माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद आणि सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन यांच्याकडेही एक दिवसासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

Protected Content