मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर राज्य सरकारने शाळेकरी मुलींच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे. यामुळे पोलिसांना त्वरीत गैरप्रकाराची माहिती मिळेल, अशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
बदलापूर घटनेबाबत बोलताना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, ‘राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटन लावले जाणार आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आहे. पॅनिक बटणद्वारे पोलिसांना गैरप्रकाराची त्वरीत माहिती मिळेल.’ पुढे दीपक केसरकर म्हणाले की, ‘मुंबई परिक्षेत्राच्या उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. या तपासात विविध विभागांचे लोक सहभागी झाले होते. कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करायचे, हे पोलिस ठरवतील. निष्काळजीपणा आढळलेल्याची सहआरोपी म्हणून ओळख पटली आहे. त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.’