पाल कृषी विज्ञान केंद्रात वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख पद पाच महिन्यापासून रिक्त

WhatsApp Image 2019 07 13 at 6.08.40 PM

रावेर, प्रतिनिधी | पाल कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन घेत असतात. परंतु, या केंद्रातील वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख पद मागील ५ महिन्यापासून रिक्त असल्याने शासनाने लवकरात-लवकर रिक्त जागा भरण्याची मागणी शेतकरी व सर्वसाधारण जनतेकडून होत आहे

जळगाव जिल्ह्यात महत्वाचे विज्ञान केंद्र म्हणून पालकडे पाहीले जाते. रावेर,भुसावळ, मुक्ताईनगर, यावल,चोपडा तालुके या विज्ञान केंद्राच्या जवळ येतात. रावेर तालुक्यात देखिल मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. तसेच आदिवासी भाग देखिल लागून आहे. याच आदिवासी भागातील पाल येथे केंद्र सरकारचे कृषी विज्ञान केंद्र आहे. येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख डॉ. ईश्वर सिंग यांची बदली फेब्रुवारीमध्ये झाली असून तेव्हा पासून हे पद रिक्त आहे. कृषिचा विस्तार करणे, ,शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, कृषीचे ट्रेनिंग देणे, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करणे यासह इतर उपक्रम राबविण्याची जबाबदारी कृषि विज्ञान केंद्रची व त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रमुखांची असते. परंतु, येथे कार्यक्रम समन्वयक प्रमुख,वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख पदच अनेक महिन्यां पासून रिक्त आहे हे पद तात्काळ भरण्याची मागणी जोर धरत आहेत.

Protected Content