जळगावचा बेपत्ता परब दुसऱ्या दिवशी पहूरला सापडला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सेंट्रल बँक कॉलनीत राहणारा मुलगा ट्यूशनला जावून येतो असे सांगून काल सायंकाळपासून पिंप्राळा येथून बेपत्ता झाला होता. शोधाशोध करतांना पहूर शहरात आढळून आले आहे. पहूर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

परब रविंद्र स्वामी (वय-१६) रा. सेंट्रल बँक कॉलनी श्री मंगलमुर्ती नगर पिंप्राळा असे सापडलेल्या मुलाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, परब स्वामी हा दहावीला शिकतो आणि आपल्या आईवडीलांसह राहतो. काल शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गावात ट्यूशनला जातो असे सांगून घराबाहेर पडला. दरम्यान रात्री उशीर झाल्याने वडीलांनी संबंधित शिक्षक व मित्रांना फोन केला असता परब हा ट्यूशनला आलाच नव्हता असे समजले. कुटुंबियांनी शोधाशोध करण्यास सुरूवात केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली. दरम्यान आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास परब हा पहूर येथे असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. आणि कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. पहूर पोलीसांनी परबला ताब्यात घेतले असून त्याला घेण्यासाठी नातेवाईका पहूरला रवाना झाले आहे. 

Protected Content