Home क्राईम नातवाच्या पाठोपाठ अपघातात जखमी आजोबांचाही मृत्यू !

नातवाच्या पाठोपाठ अपघातात जखमी आजोबांचाही मृत्यू !

0
140

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या हिवरी फाट्याजवळ भरधाव ट्रकने बैलगाडीला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात नातू आणि पाठोपाठ आजोबाचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पहुरपेठ येथील नजीर शेख मुसा (वय ६५) हे नातू नईम शेख नासिर(वय १८) व रहीम शेख नासिर (वय १२) हे तिघे शनिवारी सकाळी वाकोदच्या बाजारात बैलजोडी विक्रीसाठी गेले होते. परंतु बैलजोडी विक्री न झाल्याने दुपारी ते घरी परत येत होते. दरम्यान हिवरी फाट्याजवळ मागून येणार्‍या टी. एन. ७२ बी. ए. ०४५३ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या बैलगाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये नातू रहिमचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबा नजीर हे गंभीर जखमी झाले. या अपघातात एका बैलाचाही जागीच मृत्यू झाला. नजीर शेख मुसा यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी दुपारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नातवाच्या पाठोपाठ आजोबांचाही मृत्यू झाल्याने पहूरपेठसह परिसरावर शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound