पहूरच्या ग्रामीण रुग्णालयात काम बंद आंदोलन

pahur hospital

पहूर , ता . जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात आधिपरिचारकास काल झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी वैदयकिय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी शनिवारी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, दोन कंत्राटी वैदयकिय अधिकार्‍यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

याबाबत वृत्त असे की, केवडेश्‍वर महादेव मंदीराच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत काल पाच महिला जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचारादरम्यान जिप सदस्य अमित देशमुख अधिपरी चार क आबादेव कराड यांच्यात वाद होवून हाणामारी झाल्याने पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने बाहय रुग्णसेवा ठप्प झाली. सकाळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ .एन.एस. चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली . तर रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डॉ. हर्षल महाजन व डॉ. मंजूषा पाटील यांनी राजीनामे दिले. तर दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत काम बंद आंदोतन चालूच राहील असे कर्मचार्‍यांनी सांगीतले . सध्या डॉ. हर्षल चांदा यांच्याकडे पहूर ग्रामीण रुग्णालयाचा प्रभारी पदभार आहे. त्यांच्याकडे जामनेर व बोदवडचाही प्रभारी पदभार असल्याने पहूरच्या रुग्णांची गैरसोय होणार आहे. दरम्यान अधिपरिचारक कराड यांच्यावरही जळगांवला उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या विरूद्ध पहूर पोलीसात विनयभंग , जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Add Comment

Protected Content