पांचाळ समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री ना. गिरीश महाजन

8e92061b a5ce 4e4b 8bcb ad95432e14e1

 

जामनेर (प्रतिनिधी) शहरातील एकलव्य नगर भागातील रहिवासी पांचाळ (गिसाळी) समाज हा मागासलेला असून तरुणांनी पारंपरिक व्यवसायात अडकून न रहाता, शिक्षणासोबत नोकरीसाठी प्रयत्न करावे. तसेच पांचाळ समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन नेहमी कटिबद्ध असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच केले. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित जातीचे प्रमाणात वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

 

यावेळी नगर अध्यक्षा साधना महाजन,तहसीलदार नामदेव टिळेकर, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,बांधकाम सभापती महेंद्र बाविस्कर, नगरसेवक जितेंद्र पाटील नवल पाटील,राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून जामनेर शहरात राहणाऱ्या पांचाळ समाजाजवळ कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसतांना प्रभागाचे नगरसेवक जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर यांनी त्यांचे मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड काढून त्यांना पंतप्रधान आवास योजनेत सहभागी करून घेतले. तसेच आता अनेक अडचणींना सामोरे जाऊन १८५ जणांना जातीचे प्रमाणपत्र ना. महाजन यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी देवराम घिसाडी,शिवलाल घिसाडी,प्रताप घिसाडी,किसन घिसाडी, देवा घिसाडी, राजू घिसाडी, भारत घिसाडी, दगडू घिसाडी, विकास घिसाडी, अजय घिसाडी, राहुल घिसाडी, बंटी घिसाडी, सागर घिसाडी, विक्रांत घिसाडी आदी यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content