टाकरखेडा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रंगल्या वक्तृत्व स्पर्धा

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टाकरखेडा येथील जि.प मराठी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील  इयत्ता ५ वी तील विद्यार्थीनी वृषाली देवानंद डाकोरकर हि होती. उपस्थित बालिकांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार यांच्या हस्ते  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ संभाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी  दिलेल्या संदेशाचे पत्रके वाटप करण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना शाळेतर्फे शालेय प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गटशिक्षणाधिकारी आर. ए. लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अभ्यासाबरोबर वक्तव्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्पर्धेत. यश मिळविण्यासाठी सहभाग घेणे गरजेचे आहे. विजयी स्पर्धकांचे तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली.

सदर कार्यक्रमास  उपसरपंच धर्मराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपाली उघडे, उपाध्यक्ष सोनाली गोसावी, सदस्य आशा सपकाळ, शिवाजी डोंगरे, केंद्रप्रमुख विकास वराडे, पालक भाऊराव उघडे  , नाना सुरळकर, अनिता भोई,गीता लोहार, वैशाली दांडगे,कोकिळा लोहार, आशा कोळी,देवकाबाई लोहार, जयश्री आवारे  आशा भोई, राणी लोहार , माधुरी पारधी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे :- इयत्ता दुसरी- १)तन्हवी गोसावी (प्रथम) २)अक्षरा देवरे (द्वितीय) ३)लावण्या पाटील (तृतीय) ४)जान्हवी वझरे (उत्तेजनार्थ) इयत्ता तिसरी-१)अर्पिता सुरळकर (प्रथम) २)वैष्णवी भोई (द्वितीय) ३)आदर्श बोराडे (तृतीय) ४)कांचन भोई (उत्तेजनार्थ) इयत्ता चौथी-१)चैताली बावस्कर (प्रथम) २)हेमंत सुरळकर (द्वितीय) ३)पल्लवी भोई (तृतीय) ४)जयेश डोंगरे (उत्तेजनार्थ) इयत्ता पाचवी-१)नंदिनी लोहार (प्रथम)२)सुशिल डोंगरे (द्वितीय) ३)अमृता सुरळकर (तृतीय) ४)भावेश भोई , निशा सपकाळ, वृषाली डाकोरकर (उत्तेजनार्थ) इयत्ता सहावी:-१)कोमल भोई (प्रथम) २)सानिया सुरळकर (द्वितीय) ३)रोहित बोराडे (तृतीय) ४)दिशा दांडगे (उत्तेजनार्थ) इयत्ता सातवी-१)अक्षरा पडोळ (प्रथम) २) भूमिका आवारे (द्वितीय) ३)गितेश आगळे (तृतीय) प्राची पाटील, दिशा भोई (उत्तेजनार्थ)

परीक्षक म्हणून श्रीमती निर्मला महाजन, श्रीमती छाया पारधे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमचे सुत्रसंचलन अक्षरा पडोळ, प्राची पाटील या विद्यार्थ्यांनी केले व आभार उपशिक्षक रामेश्वर आहेर यांनी मानले.

Protected Content