पहूर येथे मानवाधिकार संरक्षण समितीतर्फे कोरोना योध्दांचा सन्मान

पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी) । मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने पहूर ग्रामपंचायत कार्यालयात येथील कोरोना योध्द्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कोरोना योध्दा हा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

कोरोना विषाणू महामारीशी संघर्ष करत प्रसंगी स्वतः चा जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचविणारे डॉक्टर्स , लॉकडाऊनच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत माणुसकीचे दर्शन घडविणारे पोलिस अधिकारी , प्रसार माध्यमांद्वारा कोरोना आजाराविषयी जनजागृती करणारे पत्रकार तसेच विलगीकरण कक्षाची स्वच्छता करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ‘ कोरोना योद्धा ‘ पुरस्कार देऊन शनिवारी पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली, भारत सरकार मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे होते. प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे यांनी केले. याप्रसंगी माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, सरपंचपती रामेश्वर पाटील, पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, पत्रकार रवींद्र लाठे, मानवाधिकार संरक्षण समिती खानदेश जनसंपर्क अधिकारी संतोष चिंचोले यांनी मनोगतातून कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव केला .

पुरस्कार प्राप्त कोरोना योद्धे
राकेशसिंह परदेशी ( ए. पी. आय .पहूर पो.स्टे. ), किरण बर्गे (पी.एस. आय. ), डॉ .हर्षल चांदा (वैद्यकीय अधीक्षक पहूर ग्रामीण रुग्णालय), डॉ. जितेंद्र वानखेडे (वैद्यकिय अधिकारी ), लॅब टेक्नीशियन चौधरी, शंकर भामेरे , अध्यक्ष शहर पत्रकार संघटना, जेष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे, शरद नरवाडे ग्रामपंचायत कर्मचारी पहूर पेठ, दिलीप बाविस्कर पहुर कसबे सफाई कर्मचारी, पत्रकार मनोज जोशी, आशा वर्कर मंगला दातीर, सुलोचना बारी, पत्रकार रविंद्र घोलप, रविंद्र लाठे पत्रकार व लाईव्ह ट्रेन्डस न्युज प्रतिनिधी पहूर, गणेश पांढरे पत्रकार , शरद बेलपत्रे पत्रकार , सुषमा चव्हाण अंगणवाडी शिक्षीका , चेतन राेकडे (सामाजीक कार्यकर्ते), राजू जाधव ( सामाजीक कार्यकर्ते )

यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख , भारत पाटील , शांताराम गोंधनखेडे ,मानवाधिकार समितीचे जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पाटील ,जामनेर तालुका संपर्क अधिकारी दशरथ पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले .सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले .आभार मनोज जोशी यांनी मानले. सर्व कोरोना योद्ध्यांचे पहूर परिसरातून अभिनंदन होत आहे .

Protected Content