अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई-खताळ

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । बस स्थानकावर झालेल्या दगडफेकीची घटना निंदनीय असून अशा घटना होऊ नयेत यासाठी आम्ही पोलीस या नात्याने सदैव तत्पर राहू. तसेच अवैध धंदेवल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन येथील पोलिस निरीक्षक राहूल खताळ यांनी केले. ते शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

पहूर येथे काल सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रशासन चालविताना राजकीय -सामाजिक-पत्रकारिता यासह सर्वच क्षेत्रातील घटकांना सोबत घेऊन चालावे लागते असे पोलीस निरिक्षक खताळ म्हणाले . पुढे बोलताना ते म्हणाले की , अवैध व्यवसाय करणार्‍यांची गय केली जाणार नाही. तसेच पहूर बस स्थानकावर रहदारीस अडथळा होऊ नये , नागरिकांना शिस्त लागावी,यासाठी लोकप्रतिनिधींचेही सहकार्य अपेक्षित आहे.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद उराशी बाळगून पोलिस नेहमीच सत्याच्या पाठीशी उभे राहतात , पोलिस हे जनतेचे मित्र असून जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे ,कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल ,तसेच अवैध धंद्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी बस स्थानकावर झालेल्या दगडफेकीची घटना निंदनीय असून अशा घटना होऊ नयेत यासाठी आम्ही पोलीस या नात्याने सदैव तत्पर राहू असे , प्रतिपादन पहूर पोलिसस्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूल खताळ यांनी या बैठकीत केले.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी उपसरपंच राजू पाटील, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे , पहूर पेठ विकासो चेअरमन किरण खैरणार , पहूर – कसबे विकासो चेअरमन ज्ञानेश्‍वर करवंदे , पत्रकार शरद बेलपत्रे , शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे, पत्रकार रवींद्र लाठे, राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश पाटील , आदिवासी संघटनेचे पदाधिकारी फिरोज तडवी, किरण पाटील यांनीही अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठवत पहूर मध्ये शांतता नांदावी तसेच चोर्‍यांचे वाढते सत्र थांबविण्यासाठी पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बाजार समिती सभापती संजय देशमुख , माजी सरपंच शंकर जाधव , उपसरपंच श्याम सावळे , माजी उपसरपंच रविंद्र मोरे , माजी उपसरपंच इका पहेलवान, माजी उपसरपंच युसूफ बाबा , ईश्‍वर बारी , पत्रकार रविंद्र घोलप , शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष माळी यांच्यासह पोलीस हवालदार शशिकांत पाटील , जितेंद्र परदेशी, देशमुख, अनिल देवरे , अनिल राठोड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी पोलीस पाटील विश्‍वनाथ वानखेडे यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे यांनी आभार मानले .

Protected Content