Home आरोग्य पाचोरा येथील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली भेट

पाचोरा येथील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली भेट

0
32


 

पाचोरा प्रतिनिधी | जळगाव येथील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात कोविड लसीकरण सुरु असलेल्या केंद्रावर आज (दि.१४ डिसेंबर) भेट दिली असून पाहणी केली आहे.

कोरोना लसीकरण संबधीत लसीकरण केंद्र अजून वाढविण्यात येणार असून नागरिकांना देण्यात येणाऱ्या दुसऱ्या डोसवर जास्त भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्थानिक प्रशासनाला दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ तसेच पाचोरा येथील महसूल विभागाचे कर्मचारी, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक डी. एस. मराठे, प्रशांत कंडारे सह न. पा. कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound