पाचोरा, प्रतिनिधी । ओबीसी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात विविध समाज संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
राज्यातील ओबोसींच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यासाठी पाचोरा येथे महात्मा फुले समता परिषदेने विविध ओबीसी समाजाच्या माध्यमातून तहसीलदारांना मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण, पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. पायी चालत तहसिलदार पाचोरा यांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संतोष परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन खलील देशमुख यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम मालकर, अझहर खान यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कन्हैय्या देवरे यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. परंतु ते आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता काम नये, ओबीसी संवर्गातील समाजाची जनगणना करण्यात यावी, शैक्षणिक क्षेत्रात संवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण १०० टक्के सवलती लागू करण्यात यावी, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचे उत्पन्न मर्यादा वाढवावी, मुलींची पहिली शाळा भरलेली भिडे वाडा पुणे राष्ट्रीय स्मारकाच्या घोषित करण्यात यावे. या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, शालिग्राम मालकर, माजी नगराध्यक्ष बापु सोनार, माजी नगरसेवक श्रीराम महाले, निरीक्षक दिनेश पाटील, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष अॅड. वैशाली महाजन, आरती शिंपी, प्रेरणा महाजन, नगरसेवक वासुदेव महाजन, दत्ता जडे, अशोक मोरे, साहेबराव महाजन, आयुब बागवान, सतिष चौधरी, नाना देवरे, समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष परदेशी, कार्याध्यक्ष चिंधु मोकळं, राजेंद्र रंगराव महाजन, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय महाले, युवक जिल्हाध्यक्ष गौरव महाजन, माळी समाज अध्यक्ष संतोष महाजन, तेली समाज अध्यक्ष नारायण चौधरी, मुस्लिम समाज अध्यक्ष अझहर खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, अशोक बळीराम महाजन, ज्ञानेश्वर महाजन, सुदर्शन महाजन, युवराज महाजन, शरद गीते, सुनिल महाजन, प्रमोद महाजन, बबलू महाजन, असिफ खान, मयूर महाजन, डांभुर्णीचे उपसरपंच शांतीलाल परदेशी, ईश्वर परदेशी, भगवान परदेशी, जोतिश परदेशी, प्रदीप परदेशी, ज्ञानेश्वर परदेशी, मोतीलाल परदेशी, बशीर खान, हारून बागवान, शुभम महाजन, नथु महाजन, किरण जाधव, परशुराम नाईक, रवींद्र भावसार यांचे सह ओबीसी समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.