खोटे नगर परिसरात आढळले दिवड जातीच्या सापाची पिल्लं

 

जळगाव, प्रतिनिधी । आज खोटे नगर परिसरातील तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीमध्ये दिवड जातीच्या सापांचे १० पिल्ले आढळून आले आहेत. सर्पमित्रांनी त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले.

तालुका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी किशोर पवार यांच्या घरी दिवड जातीचे सापाचे पिल्लं १० पिल्लं त्यांच्या पाण्याच्या टाकीत आढळून आलेत. त्यांनी याबाबत सर्पमित्र अरुण सपकाळे यांना कळविले असता व्हीजेएसएस ग्रुपचे बाळकृष्ण देवरे यांनी व्हीजेएसएस कंट्रोल रुम या व्हाट्स अप ग्रुपला याबाबत मॅसेज टाकला होता. तो मॅसेज वाचून जगदिश बैरागी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह श्री. पवार यांच्या घरी पोहचले. रागी यांना सापाच्या पिलं यांच्या सुटकेसाठी रवींद्र भोई, तेजस मोरे यांनी मदत केली. दरम्यान, या पथकास तालुका पोलीस स्टेशनच्या कंपाउंड मध्येकोब्रा सापाची कात आढळून आली आहे.

Protected Content