वनसंरक्षक आर.के. वानखेडे यांची मोहवृक्ष लागवड पथदर्शक प्रकल्पास भेट

चोपडा प्रतिनिधी । येथील शेतकरी अवधूत महाजन यांनी बागायती शेतीत प्रायोगिक तत्त्वावर वनविभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाने जंगलीवृक्ष संवर्धन योजनेअंतर्गत २००७ या वर्षी यावल वन विभागातून रोपे घेऊन मोह रोपांची लागवड केली असून महाराष्ट्र शासन वन विभाग प्रमुख अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखेडे यांची मोहवृक्ष लागवड पथदर्शक प्रकल्पास भेट दिली. 

त्यांना शेंडा कलम पद्धतीने कलमे करून सातपुड्यातील वेगवेगळ्या गुणवैशिष्ट असलेल्या जुन्या वृक्षांच्या संशोधित निरीक्षणातून व आदिवासी बांधवांच्या प्रत्यक्ष अनुभवातून मोह वृक्षाची फळबाग यशस्वी ‌केली असुन मोहाला आयुर्वेदात खूप महत्त्व सांगितले आहे शेतीतील मोह रूक्ष लागवड प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हमखास आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा. दुष्काळावर मात करणारा.गुणकारी औषधी. सेंद्रीय शेती पूरक ठरणारा आहे. स्थानिक रोजगार निर्माण करणारा. पर्यावरण व जैवविविधता संतुलन ठेवणारा. प्रक्रिया उद्योगातून अर्थव्यवस्थेला चालना देणारा.जागतिक अर्थकारणात चलन देणारा व विशेषतः आपल्या देशाची नैसर्गिक मक्तेदारी असलेला कल्पतरू आहे.या वृक्षाची फुले फळे पाने साल डिंक चिक रस सर्व संजीवनी आहे.या प्रयोगासाठी महाजन यांनी कृषी विज्ञान केंद्र. कृषी तज्ञ. कृषिशास्त्रज्ञ. विद्यापीठातील संशोधक. केंद्रीय सिपेट संस्था. वन आणि कृषी खात्याचे अधिकारी व स्थानिक आदिवासी बांधवाच्या अनुभव संकलनातून वाटचाल करीत आहेत. श्री अवधूत महाजन यांना इतर फळबाग संगोपनार्थ उल्लेखनीय कार्याबद्दल २०११साली राज्य उद्यान पंडित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच १६ जुलै २०१९ रोजी भारतीय कृषि अनुसंधान संस्था.(ICAR) दिल्ली. या संस्थेच्यावतीने ९१ व्या वर्धापन समारोप प्रसंगी नवोदित शेतकरी (innovative Farmers)म्हणून महाराष्ट्रातून कृषी विज्ञान केंद्र पाल. अटेरी पुणे (ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी एप्लीकेयन रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे ) यांच्या शिफारशीने या उपक्रमाची दखल घेऊन (आय.सी.ए.आर.) संस्थेने  उपक्रम सहभाग नोंदवून गौरवण्यात आले.

अशा या पथदर्शक प्रकल्पाची दखल महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (संशोधन. शिक्षण. प्रशिक्षण.) यांनी घेऊन वन विभागाच्या संशोधन विभागीय कार्यालय सहाय्यक वन संरक्षक (ACF) जालना येथील विभाग प्रमुख ए.आर. दीक्षित यांनी क्षेत्रभेट अहवाल सादर केला. या संदर्भात अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक संशोधन विभागाचे प्रमुख आर के वानखेडे वनसंरक्षक यशवंत बहाले चिखलदरा वनपाल जगदीश बारेला यांच्या पथकाने प्रत्यक्ष क्षेत्र भेट देऊन अवधूत महाजन यांच्याकडून माहिती जाणून घेतली शेतकऱ्यांसाठी शेतीत हा मोह वृक्ष पथदर्शक प्रकल्प भविष्यकालीन शेतीपूरक प्रक्रिया उद्योग आणि उपघटकाच्या मुल्यवर्धनार्थ प्रकल्प विस्तारासाठी दिशादर्शक ठरेल त्यासाठी वन विभाग प्रयत्नशील राहील असे क्षेत्रभेट प्रसंगी वानखेडे यांनी मतव्यक्त केले  याप्रसंगी “मोह एक कल्पतरू”

ही स्वयम् लिखित माहिती संकलित पुस्तिका प्रकाशित करण्यात आली पुस्तिका भेट देऊन पथकाचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी बी.जी महाजन संचालक (निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ) चुंचाळे येथील भूमिपुत्र शेतकरी स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष उदय महाजन उपाध्यक्ष प्रशांत चौधरी व गटाचे सदस्य आणि चुंचाळे, मामलदे, गाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते. क्षेत्र भेट दिल्याबद्दल सर्वांचे महाजन यांनी आभार व्यक्त केले.

 

Protected Content