वेब मीडिया असोसिएशनची बैठक उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी | येथे वेब मीडिया असोसिएशनची बैठक उत्साहात पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

वेब मिडीयाच्या विविध पैलुंवर चर्चा करण्यासाठी संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांनी बैठक बोलावली होती. बैठकीत सर्वानुमते विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील व तालुका उपाध्यक्ष बंडु सोनार यांचा वाढदिवस असल्याने सर्व वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी सोबत विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर व राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा येथील मंगलमुर्ती हॉस्पिटल येथे उत्साहपुर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.

याच कार्यक्रमात गत २५ वर्षापासुन ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवडून जाणारे तसेच देशदुत व आरोग्यदुत न्युजचे पत्रकार चिंतामण पाटील यांना वेब मिडीया असोसिएशन मध्ये प्रवेश घेऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर यांनी वेगवेगळ्या विषयांवर सकारात्मक चर्चा व मार्गदर्शन केले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील यांनी वेब मिडीया असोसिएशन ची संकल्पना, धोरण आणि उद्दीष्टे याबाबत माहिती जाणुन घेतली. तसेच सर्व वेब मिडीया पत्रकारांची मते व प्रतिक्रिया समजुन घेतले आणि त्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली.

यावेळी वेब मिडीया असोसिएशन चे कार्यकारणी सदस्य योगेश पाटील, राजु धनराळे, जिल्हा अध्यक्ष ईश्वर चोरडिया, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा सचिव नंदु शेलकर, दिनेश चौधरी जिल्हा सरचिटणीस गणेश शिंदे, जिल्हा संघटक एन. एस. भुरे, जिल्हा समन्वयक जावेद शेख, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने, दिपक पवार, आतिक चांगरे, तालुकाध्यक्ष निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बंडु सोनार, दिपक गढरी, तालुका सचिव संजय पाटील, तालुका सरचिटणीस दिलीप परदेशी, तालुका समन्वयक प्रमोद बारी, दिलीप पाटील, फकीरचंद पाटील, सचिन चौधरी, रविशंकर पांडे, चिंतामण पाटील आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!