पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील यांना तृतीय स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
निर्मल सीड्सचे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांना त्यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील त्यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समाधीस्थळावर मान्यवरांनी माल्यार्पण करून तात्यांच्या कार्याला उजाळा दिला.
याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील, निर्मल सिडस्चे संचालक डॉ. सुरेश पाटील, डी. आर. देशमुख, डॉ. जे. सी. राजपूत, तात्यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी, कमलताई पाटील, निर्मल स्कूलचे सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी, प्रा. समाधान पाटील, मेहताबसिंग नाईक, दिलीप भाडांरकर, निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील, प्रमोद दळवी, वसंत वायाळ, संशोधन समन्वयक आय. एस. हलकुडे, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, सुनीताताई पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, दीपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, नोवेल सिड्सचे संचालक डॉ. जितेंद्र सोलंकी, तुषार देशमुख, शांताराम सोनजी पाटील, गणेश पाटील, आशिर्वाद इन्फ्राचे मुकुंद बिल्दीकर, महाराष्ट्र ट्रान्सपोर्टचे रवी केसवाणी, स्वीय सहायक राजू पाटील, शरद पाटे , पप्पू राजपूत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.