ट्रॅक्टरच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार: ट्रॅक्टर चालक झाला फरार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा ते आखतवाडे रोडवरील भरदार ट्रॅक्टरच्या धडकेत पायी जाणाऱ्या वृद्ध महिला जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी चौकशी अंतिम सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात विना क्रमांकाच्या अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमलबाई फकीरा बाशिंगे वय-७१, रा. बदरखे ता. पाचोरा अशी माहिती झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, विमलबाई बाशिंगे या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या  सुमारास विमलबाई फकीरा बाशिंगे या आपला मुलगा परमेश्वर फकीरा बाशिंगे यांच्यासोबत पायी जात होत्या. त्यावेळी त्यांना विनाक्रमांकाच्या अज्ञात ट्रॅक्टरने विमलबाई यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पसारा झाला होता. या घटनेप्रकरणी चौकशीअंती अखेर पाचोरा पोलीस ठाण्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील हे करीत आहे.

Protected Content