नाना पटोले राष्ट्रवादीवर बरसले

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  नाना पटोले यांनी मुंबईत  आज  2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत असं सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला काँग्रेस मरणासन्न अवस्थेत अजिबातच नाही सांगत संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते असंही  ते म्हणाले

 

याआधीही आम्हाला धोका मिळालेला आहे. आता तसा २०१४ सारखा धोका पुन्हा मिळू नये यासाठी पक्ष रणनीती आखेल. त्यानुसारच काम केलं जाईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

 

शरद पवार स्वबळाच्या मुद्द्यावरुन नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते त्यांना भेटायला गेले का असा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी उत्तर दिलं की,  भाजपाने संपवलेल्या ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत त्या संदर्भातली चर्चा आमच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत केली.

 

स्वबळाच्या मुद्द्यावरुन पुनर्विचार करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “नाही, हा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात येईल. मी फक्त एवढंच सांगेन की, काल पवारांनी जे वक्तव्य केलं, तसाच निर्णय त्यांनी २०१४ मध्येही घेतला होता. तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय़ होता. आमच्या पक्षाचाही काय करायचं, कसं करायचं याबद्दलचा निर्णय होईल. ती आमच्या पक्षाची रणनीती असेल.”

 

सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी विचारणा केली असता नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली होती. “आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचं आमचं धोरण जाहीर केलं आहे. समजा आम्ही सोबत आहोत असं म्हटलं आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असं सांगितलं, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार”, असं नाना पटोले म्हणाले होते.

 

Protected Content