कापूस चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातगाव डोंगरी येथून कपाशी चोरणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सातगाव (डोंगरी) येथील सकृद्दीन तडवी या शेतकर्‍याच्या बंद घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन २ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दि. ५ जानेवारी रोजी चोरून नेला होता. त्याबाबत सकृद्दीन तडवी यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन मध्ये गु. र. नं. ५ / २०२३ भा. द. वि. ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सलामत तडवी व समशूद्दीन तडवी यांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून दीड क्विंटल कापूस केला आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस नाईक रवींद्र पाटील, पोलिस हवालदार किरण ब्राम्हणे, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पाटील, ए. एस. आय. रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: