योगेशला जिवानीशी संपविण्याचा उध्दव यांचा प्रयत्न : रामदास कदम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माझे पुत्र आमदार योगेश कदम यांना संपविण्याचा उध्दव ठाकरे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला काल रात्री झालेल्या अपघातानंतर कदम यांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता. तर त्यांचे वडील तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी टिव्ही नाईन या वाहिनीशी बोलतांना याच स्वरूपाचा अतिशय गंभीर आरोप केला आहे.

या संदर्भात रामदास कदम म्हणाले की, आधी योगेश कदम यांची राजकीय कारकिर्द समाप्त करण्याचे प्रयत्न उध्दव ठाकरे यांनी केले होते. त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर ते योगेशला जीवानीशी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

Protected Content