पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ते वरसाडे रस्त्यावर आज छोटा हत्ती हे वाहन उलटून भीषण अपघात झाला आहे.
पिंपळगाव (हरेश्वर) येथील बापू पाटील यांच्या शेतात मजूर मजुरी करायला जातात. संध्याकाळी शेतातून गाडी मध्ये बारा मजूर घेऊन घरी येत होते. बापू पाटील हे त्यांच्या स्वतः च्या मालकीची छोटा हत्ती गाडी चालवीत असतांना समोरून येणार्या मोटार सायकल चालकास वाचविण्याच्या प्रयत्नाने गाडी जागीच पलटी झाली. हा अपघात सायंकाळी उशीरा घडला.
या अपघातात आचल शाहरुख तडवी, राजू सुपडू भिल, शाहरुख शौकत तडवी, छायाबाई संजू सोनावणे, रुखाबाई तडवी, सुशीला एकनाथ सोनावणे, सुमनबाई हिरामण भिल, मुन्नाबाई इकबाल तडवी, अलका भिल, इकबाल तडवी, हंसीना नवाब तडवी, किसन भिल हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते रवी गीते, ग्राम पंचायत सदस्य अंतिम महाजन, माजी ग्राम पंचायत सदस्य नाना सरकार सामाजिक कार्यकर्ते अनिल महाजन, सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील, सरोज तडवी यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्तांना गामीण रुग्णालय पिंवळगाव हरेश्वर येथे दाखल करण्यात आले.
पिंपळगाव (हरेश्वर) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ. रोशन राजपूत, अधिपरिचारक गोकुळ मोकाशे, अधिपरिचारिका शिंदे सिस्टर रोहन कंडारे, अम्बुलंस ड्रायव्हर बाजीराव गीते, शशिकांत मालकर यांनी गावातील ग्रामस्थांच्या वतीने उपचार करण्यास मदत केली. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून तीन मजुरांचा पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.