Home क्राईम बसच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू; नवीन बसस्थानकातील घटना

बसच्या धडकेत प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू; नवीन बसस्थानकातील घटना

0
130


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील नवीन बसस्थानक आवारात बसने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शिवशाही बसवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष रघुनाथ पारधी वय ४४ रा. पारधी वाडा, ता.धरणगाव असे मयत प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष पारधी हे धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे परिवारासह वास्तव्याला होते. शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आलेले होते. दुपारी ३ वाजता ते घरी जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आलेले होते. त्यावेळी शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९ ईएम १६३०) ने जोरदार धडक दिली. या धडकेत सुभाष पारधी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शिवशाही बसवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound