Home क्राईम संतापजनक ! खेळण्यासाठी घरी आलेल्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर नराधमाने केला अत्याचार

संतापजनक ! खेळण्यासाठी घरी आलेल्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर नराधमाने केला अत्याचार

0
65


ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाणे जिल्ह्यात ४१ वर्षीय व्यक्तीने अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना जिल्हयातील अंबरनाथ येथे घडली आहे. अब्दूल कादिर अब्दूल कलाम असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. त्याचवेळी आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण केले. मुलगी घरी परतल्यानंतर तिची अवस्था पाहून तिच्या पालकांना संशय आला. त्यांनी तिची चौकशी केली असता हा घृणास्पद प्रकार समोर आला.


Protected Content

Play sound