धावत्या बस मधून लांबविली तीन लाख रूपयांची पोत !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बसद्वारे प्रवास करणार्‍या महिलेची तब्बल तीन लाख रूपयांची पोत प्रवासात लांबविण्यात आल्याची घटना आज घडली आहे.

येथील पोलीस स्टेशनच्या परिसरात सांयकाळच्या सुमारास अचानक प्रवाशांनी भरलेली बस दाखल झाली. हा काय प्रकार आहे हे बघण्यासाठी नागरीकांची गर्दी केली. यानंतर पोलीसांनी लागलीच बस मध्ये बसलेल्या प्रवाशांची झाडा झडती घेतली तेव्हा हा प्रकार एका महीलेचे सोन्याचे दागिने चोरले गेल्याची घटना असल्याचा प्रकार समोर आला.

याप्रसंगी माहिती मिळाली की, बर्‍हाणपूरच्या राजघाट येथील रहिवासी बेबाबाई जगन्नाथ चव्हाण ( वय ६१ वर्ष ) या आज चोपडा बसस्थानका वरून सायंकाळी ५ते ५ , ३० वाजेच्या सुमारास आपल्या गावी बर्‍हाणपुर जाण्यासाठी कल्याण ते रावेर जाणार्‍या बस क्रमांक एमएच २० बिएल२२७१या एसटी बसने आपला मुलगा शैलेन्द्र जगन्नाथ चव्हाण यांच्या सोबत प्रवास करीत होत्या.

या प्रवासात कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० ग्राम वजनाची सोन्याची पोत ज्याचे मुल्य सुमारे तीन लाख रूपये होते ती लांबविल्याची घटना घडली. सदरचा प्रकार बेबाबाई चव्हाण यांच्या लक्षात धानोरा तालुका चोपडा या बस थांबल्यावर लक्षात आला. याप्रसंगी या बस मधील कल्याण एसटी आगाराचे चालक ममराज हिरामण राठोड व वाहक भरत जगन्नाय माळी यांनी सरळ बस सायंकाळी सात वाजेच्या सुमारास यावल पोलीस स्टेशनमध्ये आणली.

याप्रसंगी उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी बस मधील सर्व प्रवासांची तपासणी केली. मात्र त्यात काही मिळुन आले नाही. अखेर यावल पोलीसांनी दागीने धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरले गेल्याचे सांगुन आपण चोपडा पोलीस स्टेशन मध्ये आपली तक्रार दाखल करावी असे बेबीबाई चव्हाण यांना सांगितले. यानंतर सदर एसटी बस ही आपल्या पुढील प्रवाशासाठी बर्‍हाणपुर कडे मार्गस्थ झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content