एरंडोल प्रतिनिधी । येथील बासरी वादक योगेश पाटील हे तळागाळातील लोकांपर्यंत बासरी वाजनाचे काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. दरम्यान, या कोरोना महामारी अत्यंत भयानक असून या परिस्थितीत मानसिक संतुलन बिघडते त्यासाठी संगीत व योगा अश्या गोष्टी तारक ठरतात. या उद्देशाने ऑनलाईन बासरी वादन शिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
बासरीमुळे मनावरचा तान कमी होवून बासरी सूशिर वाद्य असल्यामुळे प्राणायामचे काम करते. मुळात समस्या खुप आहेत. त्यात हा बांबूचा तुकडा काय करणार असे अनेक विचार सहज येतील. हे खरं आहे. बासरी वाजुन कोविड रुग्ण दुरुस्त होण अशक्य आहे. पण मनाला ताकत देण्याचं काम बासरी नक्कीच करेल यात शंकाच नाही. सकारात्मक विचार मनात आणणारे अनेक मार्ग नक्कीच आहेत. जसे अध्यात्म, योगा, संगीत तिघांची जोड झाली. तर ऊत्तमच. आपण नेहमी वाचतो कि संगीत ऐकाव मग नक्की काय ऐकाव ? कस ऐकाव ? याची जाणीव आपणास नसते. ऊत्तम संगीत तेच (आरोग्यासाठी) जे आपल्या डोळ्यासमोर सुरु आहे. असं संगीत सर्वोत्तमच रेकॉर्डट तर आहेच. आपल्या हातात पण जिवंत संगीत हे वलय निर्माण करतात आणि बासरी वरचा तो मंद्र पंचम आपल शरिर कंपन करतो. त्यातच राग मालकंस, भुपाली, दुर्गा हे वाजवले किंवा ऐकले जरी तरी आत्मबल वाढायला मदत होते. आपल्याला पुर्ण श्वास घेण्याची सवय लागते. त्यामुळे फुफ्फुसे बळकट होतात. लाँगनोट्स सारखा प्रकार अत्यंत गुणकारी आहे. यात पुर्ण श्वसन करुन एकच स्वर बरेच सेकंद लावला जातो आणि यामुळे मन स्थिर होते. हळु हळू छान वाटायला लागलं. किंवा तुम्हालापण वाद्य आवडतात ती शिकत रहा मग सनई, ट्रंपेट, माऊथ ॲर्गन इत्यादी गोष्टी शिकू शकतात. आणि भविष्यात एक तरी ललित कला जोपासा असे प्रतिपादन योगेश पाटील यांनी केले आहे.
योगेश पाटील यांची गुरू परंपरा पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया यांचे जेष्ठ शिष्य खांदेरत्न पं.विषेक सोनार हे योगेश पाटील यांचे गुरू आहेत. त्यांच्याच आदेशावरून कार्य सरू आहे. बासरी वादन मोफत शिबिर हे ३ मे २०२१ ते ३ जुन २०२१ पर्यंत चालणार आहे. दररोज सकाळी एक तास झूम अप वर असणार आहे. त्यासाठी योगेश पाटील यांना व्हॉट्सॲप मार्फत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. व्हॉट्सॲप नंबर 9921714553 हा आहे.