कोरोना : जिल्ह्यात आज ९९९ बाधित रूग्ण आढळले; १०३७ जण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात ९९९ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर १ हजार ३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील आकडेवारी

जळगाव शहर-१६०, जळगाव ग्रामीण-३२, भुसावळ-१३६, अमळनेर- १४७, चोपडा-१५, पाचोरा-६०, भडगाव-२५, धरणगाव-१७, यावल-२६, एरंडोल-६० , जामनेर-४९, रावेर-५९, पारोळा-३२, चाळीसगाव-८२, मुक्ताईनगर-६१, बोदवड-२० इतर जिल्ह्यातील १८ असे एकुण ९९९ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख २६ हजार ४५३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख १४ हजार ४६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ७१२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

Protected Content