बनावट गाडींच्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्र परिवहन विभागाच्या दक्षता समितीने घेतली ताब्यात

froud news

जळगाव प्रतिनिधी । परिवहन विभागाच्या दक्षता समितीच्या पथकाने आज दुपारी अचानक परिवहन कार्यालयात येवून 6 बनावट गाडींच्या गुन्ह्यासंबंधीची माहिती जाणून घेत गुन्ह्याची कागदपत्रे ताब्यात घेतले. तसेच या गुन्ह्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दक्षता समितीची नियमित तपासणी होत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितले.

परिहवन विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दक्षता समितीचे प्रमुख प्र.प.कोलवडकर यांच्यासह अन्य दोन अधिकार्‍यांच्या पथकाने (एमएच १९ बीजे ७३७४) क्रमांकाच्या कारने येवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला भेट देवून नियमित तपासणी करून माहिती जाणून घेतली. जवळपास दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान दक्षता समितीचे सदस्य उपप्रादेशिक परिवहन आधिकारी श्याम लोही यांच्या कार्यालयात जावून बनावट गाड्यांसदर्भात माहिती घेत होते. दरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून १० ट्रकची नोंदणी केल्याचे आढळून आल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयातील अधिकार्‍यांनी याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात वेगवेगळे 6 गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यात पोलीसांनी नागपूर प्रादेशिक परिवहन विभागातील निलंबित कर्मचारी दिनेशचंद्र कुलमते याला अटक केली आहे. दरम्यान कुलमते मुख्य संशयित असून तो सध्या जळगाव कारागृहात आहे. तसेच या गुन्ह्यात पोलीसांनी तस्लीमखान अय्युब खान रा. पाळधी, शकील अहमद जब्बार, शेख फकीर शेख सांडू यांना देखील अटक केली आहे.

ज्या अस्तित्वात नसतांना या गाडयांची परस्पर नोंदणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दोन गाड्या परभणी व औरंगाबाद तर काही नंदूरबार येथील असल्याचे तपासात समोर आले आहे. या सहा गुन्ह्याची माहिती तसेच कागदपत्रे दक्षता समितीच्या पथकाने ताब्यात घेतली. ऑनलाईन तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. आणि या सहा गुन्ह्यातील अहवाल तयार करून वरिष्ठांकडे तत्काळ पाठविण्याच्या आदेश दिले आहे. त्यानंतर जवळपास तासभरानंतर पथक रवाना झाले.

Protected Content