यावल येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल येथे महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ तसेच सर्व भाजपाचे आणि मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी, सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांचा मेळावा १० एप्रिल रोजी यावल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, जिल्हाध्यक्ष जळगाव (पूर्व) अमोल जावळे, आमदार लताबाई सोनवणे, माजी आ.चंद्रकांत सोनवणे, समाधान पाटील (जिल्हाध्यक्ष, शिवसेना), उमेश नेमाडे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), राजीव सोनवणे (रिपाई) लोकसभा निवडणूक प्रमुख नंदु महाजन, चोपडा विधानसभा निवडणुक प्रमुख गोविंद सैंदाणे, जेष्ठनेते जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सरचिटणिस हरलाल कोळी, कृउबाचे सभापती हर्षल पाटील, जिल्हा चिटणिस सविता भालेराव, शेतकी संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे, मीना तडवी प्रदेश कार्यकारणी सदस्य अनु.जाती जनजाती मोर्चा, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, भाजपाच्या सहकार आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश वसंत फेगडे, जळगाव जिल्हाध्यक्ष अनु.जाती मार्चाचे नागेश्वर साळवे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे, भरत महाजन व इतर मान्यवर या मेळाव्यास उपस्थित राहाणार आहे.

तरी भाजपाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीच्या सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यकर्ता मेळाव्यास उमेश फेगडे(भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष) विलास चौधरी (तालुका सरचिटणीस तथा लोकसभा विस्तारक) उजैनसिंह राजपुत (तालुका सरचिटणीस यावल) निलेश गडे (भाजपाचे शहराध्यक्ष, यावल), अनिल तेली (फैजपुर शहराध्यक्ष), सागर कोळी (तालुका अध्यक्ष युवामोर्चा), जयश्री चौधरी (यावल तालुका अध्यक्ष, महिला आघाडी), सागर नेवे (विधानसभा विस्तारक), भरत सोनगिरे (विधानसभा विस्तारक) आदी उपस्थित राहणार आहेत.

Protected Content