जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तेजोदीप नवविचार फाउंडेशनच्या वतीने ९ एप्रिल रोजी उद्योग, व्यवसाय, करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन शहरातील मयादेवी नगरातील रोटरी भवनात करण्यात आले आहे.
समाजातील सुशिक्षित युवकांना उद्योग, व्यवसाय व शेती विषयक मार्गदर्शन मिळावे तसेच करिअर व रोजगार संदर्भात मदत व्हावी या साठी तेजोदीप नवविचार फाउंडेशन, नाशिकने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बांधवाना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमात व्यवसाय सूचीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. उज्वल निकम, विशेष वरिष्ट सरकारी वकील, सूची प्रकाशक जयश्री महाजन, महापौर मनपा जळगाव, तर पुरस्कार वितरण सूर्यकांत कुमावत, सहाय्यक विक्रीकर आयुक्त जळगाव, अशोक शिंदे, सहमहाव्यवस्थापक रेड स्वस्तिक सोसा, भारत, रवींद्र लढ्ढा, लढ्ढा ऍग्रो प्लास्ट, जळगाव व माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, संजय पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जळगाव यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात महिला स्वयंरोजगार – स्वाती शहा, शेती पूरक व्यवसाय – सागर धनाड, कौशल्य विकास – रागिब अहमद, स्पर्धा परीक्षा – प्रवीण नायसे हे मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा जास्तीजास्त लाभ घेण्याचे आवाहन तेजोदीप नवविचार फाउंडेशन चे अध्यक्ष राजेश नेहते, उपाध्यक्ष -उज्वल चौधरी, सरचिटणीस -वसंत कोलते, हेमंत भंगाळे, संदीप राणे, जयंत राणे, योगेश कोलते, अतुल खडसे, नीता वराडे, ज्ञानदेव पाचपांडे, सुवर्णा वारके यांनी केले आहे.