लोडशेडिंग तात्काळ रद्द करा : जिल्हा काँग्रेसची मागणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात येणाऱ्या सर्वधर्मीयांचे सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील लोडशेडींग रद्द करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा कांग्रेसच्या वतीने जळगाव जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनाचा आशय असा की, संपूर्ण एप्रिल महिना हा सर्व जाती धर्मच्या सण उसत्वाचा महिना आहे या महिन्यात हिंदू धर्माची राम नवमी, मुस्लिम धर्माचा रमजान ख्रिश्चन ,धर्मच गुड फ्रायडे असे सण आले आहे व जळगाव जिल्ह्याचे तापमान देखील वाढत आहे. परंतू , महावितरणने आता भारनियमन करणार असे सांगितले आहे. त्या अनुषंगाने वरील सर्व कारणास्तव जिल्ह्यात भारनियमन करू नये व रद्द करावे असे जिह्वाधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदनाद्वारे सांगण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगरध्यक्ष मुजीब पटेल, मा युवक प्रदेश सरचिटणीस मुक्तदिर देशमुख, मकसूद पटेल, फैजान शहा , रमजान खान आदी पदाधिकारी उपस्थित होते

Protected Content