डॉ. बेंडाळे महाविद्यालयात काव्यवाचन कौशल्य कार्यशाळा उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग आणि डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच काव्यवाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुनिल कुलकर्णी, संचालक विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे होते. व्यासपीठावर बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, लेखन हे वास्तवाला धरून केलेले तसेच परिस्थितीसद्दृश असावं. कवितेत लयात्मकता, वेगळेपणा असावा आणि उदात्त कविता लिहिण्यासाठी व्यक्तिमत्व देखिल उदात्त असायला हवे असे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राणे मॅडम यांनी सांगितले की, मनातले भाव जरी व्यक्त केले तरीसुद्धा एक कविता तयार होऊ शकते.

एक दिवशीय कार्यशाळा चार सत्रात आयोजित करण्यात आली होती. प्रथम सत्रातील प्रमुख वक्ते म्हणून अशोक कोतवाल यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की कविता लिहिताना दुसऱ्याचं अनुकरण न करता स्वतःचं जगणं त्यातून मांडावं. द्वितीय सत्रात प्रमुख वक्ते म्हणून अजीम नवाज राही हे होते. ते मार्गदर्शन करताना म्हणाले की लेखन हे गुणवत्तापूर्ण असावे तसेच त्यांनी अभिरूची अनुभूती आणि अभिव्यक्ती या काव्यनिर्मितीच्या तीन पायऱ्या आहेत असे सांगितले. तिसरे सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रियंका सोनी प्रीत यांनी हिंदी काव्यनिर्मितीबाबत मार्गदर्शन केले. आणि चौथे सत्रात कार्यशाळेचा समारोप डॉ. योगेश महाले यांच्या मनोगताने उपप्राचार्य डॉ.पी. एन. तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रत्येक सत्राचे सूत्रसंचालन, प्रमुख वक्त्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एस बी साळवे, प्रा. डॉ. एस एस रणखांबे, प्रा. मिताली अहिरे, प्रा. योगेश खैरनार यांनी केले.

लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डॉ व्ही. जे पाटील व डॉ. पी. एन. तायडे यांच्या पाठिंब्याने सदर कार्यक्रमासाठी प्रा. संध्या फेगडे, प्रा. नंदा बेंडाळे, प्रा. सुहास पाटील, प्रा. एच आर जाधव, ग्रंथपाल एस. ए. झोपे यांनी कार्य केले.

 

Protected Content