Iftar party : पाचोरा येथे रमजान ईदनिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पोलीस स्टेशन, महसूल विभाग व शांतता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), सुधाकर वाघ नितीन तावडे व्यासपीठावर होते.

गुरुवार, दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता सामाजिक एकता व जातीय सलोखा उपक्रम अंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशन, महसूल विभाग व शांतता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रेल्वे स्थानकानजिक मस्जिदीच्या आवारात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

इफ्तार पार्टीत आ.किशोर पाटील, मा.आ.दिलीप वाघ, उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल, मौलाना नईम रजा यांनी मनोगत व्यक्त करतांना मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहुल मोरे, गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील, नितीन सुर्यवंशी, विनोद बेलदार, कॉंग्रेस ओ. बी. सी. सेलचे तालुकाध्यक्ष शेख इरफान शेख इक्बाल मणियार, जावेद शेखसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.सी.एन.चौधरी व शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.

व्हिडीओ लिंक :

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!