औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली असून यामुळे तेथे राजगर्जना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभेची घोषणा केली असली तरी याला परवानगी मिळणार की नाही ? याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. अखेर औरंगाबाद पोलिसांनी सभेला अखेर परवानगी दिली आहे. राज यांच्या सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने सावध पवित्रा घेतला होता. मात्र सुरक्षेवरून अनेक बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यातही अनेक बैठका झाल्या आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही औरंगाबादेत दाखल होत मैदानाची पाहणी केली होती आणि औरंगाबाद पोलिसांनीही सुरक्षेच्या कारणास्तव या मैदानाची पाहणी केली होती. या सर्व मोठ्या घडामोडी घडल्यानंतर अखेर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे.
यामुळे आता औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा होणार असून याची जय्यत तयारी मनसेतर्फे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.