मुक्ताई जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी)। ग्रामिण भागातील दारिद्र्य रेषेखालील स्वयंसहाय्यता बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. याकरीता जिल्हास्तरावर विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 मार्चपासून 11 मार्च, 2019 पर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव या कार्यालयामार्फत जी. एस. ग्राउंड ,जळगाव येथे जिल्हास्तरावर प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात अंदाजे 200 स्टॉल उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात नाशिक विभागातील विविध जिल्ह्याबरोबरच जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटाचे मोठ्या संख्येने स्टॉल लावण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी. असे आवाहन प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Add Comment

Protected Content