धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “सेना म्हणे चित्तीं धरा, बळकट रखुमाईच्या वरा” असा जयघोष करीत धरणगाव येथे अखिल भारतीय जिवाजी सेना, धरणगाव शहर यांच्या वतीने आज रोजी वारकरी संप्रदायातील श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला.
जळगांव जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष प्रा.बी.एन.खोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी वारकरी संप्रदायातील श्री. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, जिवाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारकरी शिक्षण संस्थेतील विदयार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तद्नंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची आस्तेवाईकपणे चौकशी करून फळे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन वारकरी शिक्षण संस्था येथे घेण्यात आले. या कार्यक्रमाला महंत हभप भगवानदासजी महाराज अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी, जिप सदस्य प्रतापराव पाटील, प.रा.संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुळकर्णी, व्हि टी गालापुरे, सचिव डॉ. मिलिंदकुमार डहाळे, प्रा. सी एस पाटील, प्रा.बी एल खोंडे, गटनेते पप्पू भावे, राजेंद्र महाजन, किरण वाणी, राजेंद्र फुलपगार, जगन्नाथ फुलपगार, अशोक झुंझारराव, दिपक झुंझारराव आदी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी संत श्रेष्ठ सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी रवींद्र निकम, अमोल महाले, निंबा नाना निकम, जगन्नाथ पुलपगार, दिगंबर निकम, सचिन झुंजारराव, सुधाकर फुलपगार, देवा निकम, गोरख फुलपगार, शिवा निकम आदींनी परिश्रम घेतले.