जितेंद्र पाटील आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित

 

एरंडोल, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने जितेंद्र पाटील यांना आरोग्य भूषण पुरस्काराने देऊन शिर्डी येथे सन्मानित करण्यात आले.

जितेंद्र पाटील यांना खासदार सदाशिव लोखंडे, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, ग्रामसेवक युनियन राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते ‘आरोग्य भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सध्या कल्याण मुंबई येथे आरोग्य धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना शिर्डी येथे आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. जितेंद्र पाटील मुंबईतील नामांकित हॉस्पिटल मधून गरीब व गरजू रुग्णांना ऑपरेशनसाठी मोफत किंवा अल्प दरात मदत करत असतात. ग्रामीण भागातील रुग्णांना मुंबईसारख्या शहरातील अत्याधुनिक व अद्यवावत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शस्त्रक्रिया शिबिर राबवतात. गरीब व गरजू रुग्णांना रोग मुक्त करण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न करतात. कोरोना महामारीत त्यांनी कल्याण सारख्या ठिकाणी गरीब गरजूना अन्नधान्य आणि रोज ७०० लोकांना जेवण देण्याचे कार्य करत असतात. तसेच असैनिक अल्बम ३० रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी २० हजार बॉटल मोफत वाटप करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जितेंद्र पाटील हे अनाथ बेघर मुलांना जेवण व दैनंदिन लागणारे साहित्य ते वाटप करतात. तसेच अपंगांना जयपुर फूट. कॅलिपर मिळवून देण्याचे कार्य करत राहतात. जितेंद्र पाटील त्यांना आतापर्यंत शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून त्यात तीन पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार समजले जातात.

Protected Content